Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी..! नीलम गोऱ्हेही अशोक खरातच्या भक्त, नाशिकच्या 5 स्टार हॉटेलमध्ये भेट, तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप

मोठी बातमी..! नीलम गोऱ्हेही अशोक खरातच्या भक्त, नाशिकच्या 5 स्टार हॉटेलमध्ये भेट, तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप

Ashok Kharat Case : नाशिकच्या स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवली आहे.

देसाई यांच्या म्हणण्यानुसार, नीलम गोऱ्हे या गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या. त्या राजकीय फायद्यासाठी त्याला भेटत होत्या, असा दावा त्यांनी केला. तसेच नाशिकमधील कॉलेज रोडवरील खरातच्या कार्यालयातही त्या वारंवार जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याशिवाय, नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांची भेट झाल्याचा दावा देखील देसाई यांनी केला. आमदारकी किंवा मंत्रीपदाच्या दृष्टीने तसेच भविष्य जाणून घेण्यासाठी गोऱ्हे या खरातला भेटत होत्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

देसाई यांनी या प्रकरणात नीलम गोऱ्हे यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. ज्या ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी समोर आल्या, त्या ठिकाणी गोऱ्हे गेल्याचा आरोप करत त्यांनी अधिक सखोल तपासाची गरज व्यक्त केली.

दरम्यान, या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!