Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संतापजनक..! अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; काही तासांत आरोपीला बेड्या

संतापजनक..! अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; काही तासांत आरोपीला बेड्या

Thane Crime News : ठाणे शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर बांधकाम साईटवर अत्याचार झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील त्या साईटवर काम करत असून आई गावी गेल्यामुळे मुलगी वडील आणि धाकट्या बहिणीसह राहत होती. काल रात्री मुलगी एकटी असल्याची संधी साधत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी काही दिवसांपूर्वीच त्या साईटवर कामासाठी आला होता, तर त्याचा भाऊ आधीपासून तेथे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दोन ते तीन पथके तयार केली. काही तासांतच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी बिहारमधील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेमुळे ठाणे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!