Today रविवार, 1st नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sunil Tatkare : “माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास…” तटकरेंचं सूचक विधान, राष्ट्रवादीतील चर्चांना नवा तडका

Sunil Tatkare : “माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास…” तटकरेंचं सूचक विधान, राष्ट्रवादीतील चर्चांना नवा तडका

Sunil Tatkare : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी एक सूचक आणि महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. पक्षांतर्गत चर्चांना वेग आलेला असतानाच त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सुनील तटकरे यांनी म्हटलं की, “माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास आहे. योग्य वेळी मी राजकीय भूमिका स्पष्टपणे मांडेन.” या विधानामुळे त्यांच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे. सध्या पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत चर्चा आणि बदलांच्या पार्श्वभूमीवर हे विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

तटकरे यांनी पुढे सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एनडीएची ताकद वाढवण्यावर आमचा भर आहे. “पक्षातील प्रमुख नेते एकत्र बसून सर्व प्रश्नांवर तोडगा काढतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांसारख्या नेत्यांचा उल्लेख करत सर्वजण एकत्र काम करतील असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, राष्ट्रवादीतील अंतर्गत हालचाली, नेतृत्वातील बदल आणि शरद पवार यांच्या भेटींच्या चर्चांमुळे वातावरण आधीच तापलेले आहे. त्यातच तटकरे यांचं हे सूचक वक्तव्य अनेक राजकीय अर्थ काढत पाहिलं जात आहे.

बारामती दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं, त्यामुळे या घडामोडींना आणखी गूढता प्राप्त झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!