Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election 2026: ‘सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी…’, मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

BMC Election 2026: ‘सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी…’, मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

BMC Election 2026: संपूर्ण सरकारी यंत्रणा आणि प्रशासन सध्या केवळ सत्ताधाऱ्यांना पुन्हा खुर्चीवर बसवण्यासाठी राबत आहे. सत्तेचा असा नंगा नाच होणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. अशा गैरमार्गाने मिळवलेल्या यशाला ‘विजय’ म्हणता येणार नाही, अशा जळजळीत शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली आहे. आज सकाळी दादर येथील बालमोहन शाळेत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

निवडणूक आयोग आणि ‘पाडू’ यंत्राचा संशयास्पद कारभार

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या नवीन यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, आयोगाने मतमोजणीसाठी ‘पाडू’ नावाचे नवे यंत्र आणले आहे, परंतु हे यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेले नाही. हे यंत्र नेमके कसे काम करते, याची कोणतीही स्पष्टता नसल्याने त्यांनी संशय व्यक्त केला. तसेच व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीनबाबत बोलताना ते म्हणाले की, मतदाराने दिलेले मत त्याच्याच पसंतीच्या उमेदवाराला गेले आहे की नाही, हे तपासण्याची कोणतीही खात्रीशीर व्यवस्था सध्या उपलब्ध नाही. वारंवार मागणी करूनही आयोगाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

बोगस मतदान आणि शाईचा वाद

मतदान प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवताना राज ठाकरे यांनी बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईवरही टीका केली. पूर्वी मतदानानंतर बोटावर पक्की शाई लावली जायची, मात्र आता केवळ मार्करने खूण केली जात आहे, जी सॅनिटायझरने सहज पुसली जाते. हे दुबार मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठीच केले जात आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. दादरच्या छबिलदास केंद्रावर दुबार मतदार पकडल्याचा उल्लेख करत, त्यांनी मनसैनिक आणि शिवसैनिकांना आज दिवसभर मतदान केंद्रांवर कडा पहारा ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पैशांचा वापर आणि प्रशासकीय मोकळीक

प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन भेटी देण्याची परवानगी देणे, हा केवळ सत्ताधारी पक्षाला पैसे वाटता यावेत यासाठी केलेला खटाटोप आहे, असा खळबळजनक दावा राज ठाकरे यांनी केला. भाजपच्या विकासकामांच्या दाव्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, एकीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे शाई पुसून बोगस मतदान करायचे, यालाच विकास म्हणायचे का? सरकारला आता राज्यात विरोधी पक्षच नको आहे, अशी त्यांची धारणा दिसत असून सत्तेचा हा गैरवापर लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!