Today शनिवार, 19th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMC Election 2026: पुणे-पिंपरीत पोलिसांचा कडा पहारा! 4 हजार केंद्रे अन् 12 हजार पोलिसांचा ताफा; प्रशासनाची जय्यत तयारी

PMC Election 2026: पुणे-पिंपरीत पोलिसांचा कडा पहारा! 4 हजार केंद्रे अन् 12 हजार पोलिसांचा ताफा; प्रशासनाची जय्यत तयारी

PMC Election 2026: महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लोकशाहीचा उत्सव शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. दोन्ही शहरांच्या सुरक्षेसाठी सुमारे १८ हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, विशेषतः संवेदनशील केंद्रांवर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे.

४ हजार केंद्रांवर ‘थ्री-लेयर’ सुरक्षा यंत्रणा

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात सुमारे ४,००० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यातील १२५ इमारती अत्यंत संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आल्या असून, तिथे क्यूआरटी (QRT) आणि एसआरपीएफच्या तुकड्या तैनात असतील. पुणे पोलीस आयुक्तांसह सहआयुक्त, ४ अपर आयुक्त आणि १४ उपायुक्तांच्या थेट नियंत्रणाखाली ७,००० पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात आहेत. याव्यतिरिक्त, बाहेरच्या जिल्ह्यांतून १,५०० कर्मचारी मागवण्यात आले असून ३,००० होमगार्डचीही मदत घेतली जात आहे. आचारसंहिता काळात खबरदारी म्हणून पोलिसांनी १५ पिस्तुले आणि २९ धारदार शस्त्रे जप्त केली असून, ३,२९४ परवानाधारक शस्त्रे जमा करून घेतली आहेत.

हेही वाचा – PMC Election 2026 : पुणे आणि मुंबईत भाजपचा भगवा फडकणार… मतदानाच्या दिवशीच चंद्रकांत पाटलांनी थेट आकडाचं सांगितला

गुन्हेगारांवर कडक वचक आणि हद्दपारी

पिंपरी-चिंचवडमध्ये निर्भय वातावरणात मतदान होण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कडक पावले उचलली आहेत. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणू शकणाऱ्या ५० उपद्रवींना शहरातून हद्दपार करण्यात आले आहे, तर ४३८ जणांना निवडणूक कालावधीत सीमेबाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत. शहराच्या सुरक्षेसाठी सहपोलीस आयुक्त आणि ८ उपायुक्तांसह एकूण ६,०९१ पोलिसांचे पथक तैनात आहे. तसेच प्रशासनाने १,३०६ परवानाधारक शस्त्रे जमा केली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे.

विशेष पथके आणि तंत्रज्ञानाचा वापर

निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी दोन्ही शहरांत अत्याधुनिक देखरेख यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी १८ स्थिर आणि १५ फिरती सर्वेलन्स पथके कार्यरत आहेत. तसेच, १५ विशेष व्हिडिओ पथके संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करत आहेत. दारू, रोकड आणि अमली पदार्थांच्या अवैध वितरणावर गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके नजर ठेवून आहेत. “नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय मतदान करावे; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,” असे आश्वासन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!