Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai Local: बुरखा घालून महिलांच्या डब्यात प्रवेश, अनेकींच्या शरीराला स्पर्श; संशय येताच धावत्या ट्रेनमधून उडी मारून पसार

Mumbai Local: बुरखा घालून महिलांच्या डब्यात प्रवेश, अनेकींच्या शरीराला स्पर्श; संशय येताच धावत्या ट्रेनमधून उडी मारून पसार

Mumbai Local: मध्य रेल्वे मार्गावरील एका लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात बुरखा घातलेला एक संशयित व्यक्ती चढल्याने खळबळ उडाली. महिला प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी त्या व्यक्तीला पकडून चौकशी करण्याचा प्रयत्न केला आणि घटनेचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. मात्र घाटकोपर स्थानकाजवळ येताच तो संशयित चालत्या ट्रेनमधून उडी मारून उलट दिशेने जाणाऱ्या कर्जत फास्ट ट्रेनमध्ये चढून फरार झाला. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चालत्या ट्रेनमधून थरारक पळ 
मिळालेल्या माहितीनुसार, CSMTकडे जाणारी लोकल ट्रेन घाटकोपर स्थानकात (Ghatkopar Railway Station) पोहोचण्याच्या आधी ही घटना घडली. महिला डब्यात बुरखा परिधान केलेला एक व्यक्ती आल्याचं दिसलं. बुरखा घातलेली व्यक्ती ही डब्यातील इतर महिलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर काही महिला प्रवाशांना संशय आला. महिलांनी त्याला घेरून प्रश्न विचारायला सुरुवात केली. याच वेळी काही प्रवाशांनी मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग केले.

ट्रेन घाटकोपर स्थानकात शिरण्याच्या आधीच संशयिताने अचानक चालत्या ट्रेनमधून उलट दिशेने उडी घेतली आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या कर्जत जाणाऱ्या फास्ट ट्रेनमध्ये चढून पळ काढला.

रेल्वेचा संयुक्त तपास सुरू
महिला प्रवाशांनी तात्काळ पोलीस कंट्रोल रूमला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडून मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर संशयिताचा तपास करण्यात आला, मात्र आरोपीचा कोणताही मागमूस लागला नाही. या प्रकरणी घाटकोपर RPF ने रेल्वे कायद्याच्या कलम 162 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कुर्ला GRPचे वरिष्ठ अधिकारी संभाजी यादव यांनी सांगितले की, GRP आणि RPF ची पथके संयुक्तपणे संशयिताचा शोध घेत आहेत. तसेच, मागील महिन्यात अंबिवली रेल्वे स्थानकावर बुरखा घालून आलेल्या एका व्यक्तीने चेन स्नॅचिंग केल्याची घटना समोर आली होती, ज्याची FIR कल्याण GRPमध्ये दाखल आहे. दोन्ही प्रकरणांतील संशयित एकच असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेचा तपास वेगाने सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!