पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट, दंत शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. ७० वर्षांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार असून, सदर मुलाखत १८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय देहूरोड, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड, पुणे-४१२१०१ येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://dehuroad.cantt.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


