Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mahayuti : ठाकरे गटातून भाजपात गेलेल्या बड्या नेत्याला अटक; नेमकं प्रकरण काय?

Mahayuti : ठाकरे गटातून भाजपात गेलेल्या बड्या नेत्याला अटक; नेमकं प्रकरण काय?

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या काही तास आधीच नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडे यांना अटक केली आहे. गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद आढळल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांची 15 तास कसून चौकशी केली. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात राजवाडे यांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.

या प्रकरणात यापूर्वीच भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याला अटक झाली असून, इतर आरोपी फरार आहेत. जुन्या वैमनस्यातून झालेल्या गोळीबार आणि मारहाण प्रकरणाने नाशिकच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. मामा राजवाडे, जे ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख होते, त्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांच्या या प्रवेशाला गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवण्याचा डाव म्हणून पाहिले जात आहे.

भाजपच्या ‘इनकमिंग’ मोहिमेंतर्गत अनेक वादग्रस्त नेत्यांना पक्षात स्थान देण्यात आले. परंतु, आता मामा राजवाडेंच्या अटकेमुळे पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात येण्याची शक्यता आहे. या घटनेने नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला असून, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!