Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, पाच जण जखमी

नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, पाच जण जखमी

नाशिक: नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात अपघाताची घटना घडली असून यात 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. सिन्नर आगारातून बस स्थानकात आली असताना बसचा ब्रेकलागल्यानं बस थेट फलाटावर चढली. या बसच्या धडकेत भीषण अपघात झाला. अंगाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अपघात

दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संतप व्यक्त करत रास्ता रोको केला. अपघातात जखमी झालेल्या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. मृत आदर्श बोराडे हा कुटुंबियांसमवेत देव दर्शनासाठी गेला होता. देवदर्शन करुन सिन्नरहून आपल्या गावी जण्याअधीच काळाने घाला घातला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!