पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मालेगाव महानगरपालिकेत रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
मालेगाव महानगरपालिकेत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मालेगाव येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दहा रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 60000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जुने आयुक्त कार्यालय, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://malegaoncorporation.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


