नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यात तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे. तुम्ही 200MP कॅमेरा असलेला Samsung फोन स्वस्तात खरेदी करू शकता. हा फोन गेल्या वर्षीच्या सुरुवातीला लाँच झाला होता. मात्र, आता हा फोन तुम्हाला स्वस्तात उपलब्ध झाला आहे.
Samsung Galaxy S24 Ultra असे या फोनचे नाव आहे. हा फोन १३४९९९ रुपयांना लाँच झाला होता. मात्र, आता हा फोन स्वस्तात उपलब्ध झाला आहे. हा फोन सध्या फ्लिपकार्टवर ८६८२३ रुपयांना लिस्टेड आहे. या किंमतीत तुम्हाला 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट मिळणार आहे. ८६८२३ रुपयांमध्ये तुम्हाला टायटॅनियम ग्रे कलरमध्ये Samsung Galaxy S24 Ultra 5G मिळेल. टायटॅनियम ब्लॅक व्हेरिएंटची किंमत अंदाजे १००० रुपये जास्त असेल. बँक ऑफर्स अंतर्गत तुम्ही ४००० रुपयांची बचत देखील करू शकता.
फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ४००० चा कॅशबॅक उपलब्ध आहे, ज्यामुळे फोनची किंमत ८२८२३ पर्यंत कमी झाली आहे. या किंमतीत २००MP + ५०MP + १२MP + १०MP क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आणि १२MP फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जनरल ३ प्रोसेसर असणार आहे.


