Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अपघात की घातपात? माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवलं; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

अपघात की घातपात? माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवलं; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

Nirmala Gavit Accident: नाशिकजवळ माजी आमदार निर्मला गावित यांच्यावर मोठी दुर्घटना ओढवली असून, घराबाहेर नातवासोबत फिरायला निघालेल्या गावित यांना वेगाने येणाऱ्या कारने मागून जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचाराधीन आहेत. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, त्यात चारचाकी वाहन थेट मागून येत गावित यांना पाठीमागून उडवते, असे स्पष्ट दिसत आहे. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, अपघाताला पूर्ण एक दिवस उलटूनही संबंधित कारचालकाला अजूनही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. या विलंबाबाबत गावित यांच्या कन्या नयना गावित यांनी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एबीपी माझाशी बोलताना त्या भावुक झाल्या. त्यांनी असा आरोप केला की, माझ्या आईचा अपघात आहे की घातपात, हे तपासून काढणे गरजेचे आहे.

हेही वाचा – सोलापुर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; चारचाकी पलटी होऊन तीघांचा मृत्यू, 11 जण जखमी

नेमका कसा घडला अपघात?

सोमवार सायंकाळी गावित आपल्या नातवाला घेऊन घराजवळ फेरफटका मारत असताना एक चारचाकी येऊन त्यांच्या अंगावर धडकली. धडकेचा जोर एवढा होता की, त्या काही फूट दूर जाऊन पडल्या. सुदैवाने नातवाला कोणतीही दुखापत झाली नाही.

कोण आहेत निर्मला गावित?

  • माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांची कन्या
  • काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात
  • दोन वेळा आमदार म्हणून निवड
  • 2019 मध्ये काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश
  • नंतर पक्षातील फूट झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल
Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!