Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gopichand Padalkar : हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये; जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातंय, गोपीचंद पडळकरांचं पुन्हा वादग्रस्त

Gopichand Padalkar : हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये; जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातंय, गोपीचंद पडळकरांचं पुन्हा वादग्रस्त

अहिल्यानगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीड जिल्ह्यातील एका सभेत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवला आहे. हिंदू मुलींना जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात असल्याचा दावा करत, त्यांनी हिंदू मुलींना जिममध्ये जाणे बंद करण्याचा सल्ला दिला. त्याऐवजी घरातच योगा किंवा व्यायाम करण्याचा अजब उपाय सुचवला. एका विशिष्ट समुदायाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत पडळकर म्हणाले, “ते” हिंदू मुलींना आमिष दाखवत आहेत. या विधानाने सोशल मीडियावरून तीव्र टीका होत आहे.

नेमकं काय म्हणाले पडळकर?

बीडमधील जाट येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पडळकर यांनी म्हटले, हिंदू मुलींना माझी नम्र विनंती आहे की जिथे ट्रेनर कोण आहे हे माहित नाही अशा जिममध्ये जाऊ नका. घरी योगा केल्यास बरे होईल. हे किती मोठे षड्यंत्र आहे हे तुम्हाला माहिती नाही. हिंदू मुलींना सांगा की त्यांनी घरी योगा किंवा व्यायाम करावा. त्यांना जिममध्ये जाण्याची गरज नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

यामागे कथित “लव्ह जिहाद” ची शक्यता असल्याचा अप्रत्यक्ष इशारा करत, त्यांनी हिंदू महिलांना सावध राहण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावरून हे व्हिडिओ व्हायरल झाले असून, अनेकांनी याला “महिलांच्या स्वातंत्र्यावर हल्ला” आणि “पुरुषप्रधान मानसिकता” असे संबोधले आहे. काहींनी मात्र पडळकरांच्या सुरक्षेच्या चिंतेला पाठिंबा दिला आहे.

अहिल्यानगरचे नाव कपाळावरही लिहावे लागेल, मुघल नावे पुसा

दरम्यान, बीडमधील प्रसारमाध्यमांशी बोलताना पडळकर यांनी होते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे हे सरकार आहे. तुम्ही कायद्याच्या देशात राहता, अहिल्यानगर कसे बोलणार नाही? कपाळावर सुद्धा अहिल्यानगर लिहावे लागेल. मुलाच्या दाखल्यावर सुद्धा हे नाव लिहावे लागणार आहे,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर “बारकी मुलं रडल्यासारखं आव आणता” याची टीका केली.

मुघल सम्राट औरंगजेब, जहांगीरसारखी नावे पुसली पाहिजेत, असे सांगत त्यांनी बीडमधील “जहांगीर मोहा” गावाचे नाव बदलण्याची मागणी केली. “मुघलांच्या वारसांची नावे असलेली गावे बदलली पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दणक्यात नावे बदलणार,” अशी घोषणा त्यांनी केली. ही मागणी २०२२ पासून सुरू असून, २०२४ मध्ये मंत्रिमंडळाने अहमदनगरचे आधिकारिक नाव “अहिल्यानगर” केले आहे. पण पडळकर यांच्या या अतिशयोक्तीपूर्ण विधानाने स्थानिक राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!