Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘साधू आले गेले आम्हाला फरक पडत नाही…’; तपोवनातील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया

‘साधू आले गेले आम्हाला फरक पडत नाही…’; तपोवनातील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया

Sayaji Shinde On Nashik Tree Cutting: नाशिकच्या तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधी आंदोलनाला आज मोठा पाठिंबा मिळाला आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे स्वतः आंदोलनस्थळी दाखल होऊन पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला साथ देण्यासाठी आले. साधूग्राम प्रकल्पासाठी एकही झाड तोडले जाऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. “झाड म्हणजे आई-वडील, त्यांचा बळी देऊन कुठला साधूग्राम आणि कुठला कुंभमेळा?” अशा कडक शब्दांत त्यांनी राज्य सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.

तपोवनातील आंदोलकांच्या पाठीशी सयाजी शिंदे

कुंभमेळ्यात साधूंच्या निवासासाठी तपोवन परिसरातील झाडे तोडण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकपासून राज्यभर हा मुद्दा चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे तपोवनात आले आणि चालू आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांनी समर्थन जाहीर केले. गिरीश महाजन यांनी केलेल्या “वृक्षतोड अपरिहार्य” या विधानावर प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदे म्हणाले, “महाजन साहेब, अशा प्रकारची विधाने करून लोकांची दिशाभूल करू नका. या जगात खरे सेलिब्रिटी असतील, तर ते म्हणजे झाडे! त्यांचे रक्षण करा, कोणताही छुपा अजेंडा राबवू नका. एकही झाड तोडले गेले तर हा विश्वासघात असेल.”

हेही वाचा – तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका; साधूग्रामवरून राज ठाकरेांचा सरकारवर घणाघात

साधू येतील-जातील, पण झाडं गेली तर पिढ्यांचा भविष्य धोक्यात

सरकारने वारंवार केलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवणे कठीण झाल्याचे सांगत शिंदे पुढे म्हणाले, “साधू येतात आणि जातात, त्याने काही फरक पडत नाही. पण झाडे गेली, तर पुढच्या पिढ्यांचे नुकसान अटळ आहे. आपण संतांचा, शिवरायांचा वारसा सांगतो आणि निसर्गाचाच नाश करतो, हे कसे चालणार? झाडांची कत्तल म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या विचारांचा अपमान आहे.”

सह्याद्री देवराईच्या वतीनेही त्यांनी नाशिककरांच्या संघर्षाला पाठिंबा जाहीर केला. “सरकार माघार घेत नसेल, तर आम्हालाही आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल. तपोवनात एकही झाड कापू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. नाशिकमधील हा पर्यावरण लढा आता अधिक जोर धरत असून, नागरिकांसोबत अनेक मान्यवरही या विरोधात उभे राहताना दिसत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!