Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

ZP Election : नाशिकमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

महापौर-उपमहापौर नावांवरून नाराजी

महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रदेश पातळीवरून आलेली नावे अचानक बदलण्यात आल्याने सुनील केदार नाराज होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महापौरपदासाठी हिमगौरी आडके, तर उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली.

पक्षातील मतभेद चव्हाट्यावर

काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी ‘आम्हाला सत्तेसाठी कुणाची गरज नाही’ असे स्पष्ट वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे पक्षातील मतभेद अधिक तीव्र झाल्याची चर्चा आहे.

प्रदेश समितीकडे राजीनामा

या सर्व घडामोडींनंतर सुनील केदार यांनी प्रदेश भाजप समितीकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. मात्र, नवीन व्यवस्था होईपर्यंत कामकाज पाहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ऐन जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान भाजपच्या शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे नाशिकमधील भाजपची रणनीती अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!