Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jalgaon Horror: भुसावळमध्ये कौटुंबिक वादातून जावयाचा सासरच्यांवर हल्ला; पत्नीच्या मामाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Jalgaon Horror: भुसावळमध्ये कौटुंबिक वादातून जावयाचा सासरच्यांवर हल्ला; पत्नीच्या मामाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Jalgaon Horror: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात कौटुंबिक वादातून रक्तरंजित हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खडका रोड परिसरातील अयान कॉलनीमध्ये शुक्रवारी, 12 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजता जावयाने केलेल्या हल्ल्यात पत्नीच्या मामाचा मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव शेख समद शेख इस्माईल (वय 40, रा. कंडारी) असे असून, जखमींची ओळख शेख जमील शेख शकूर (वय 52, रा. धुळे) अशी आहे. संशयित आरोपीचे नाव सुभान शेख भिकान कुरेशी (रा. भुसावळ) असे आहे.

सुभान शेख आणि त्याची पत्नी सैदा यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. पत्नी घर सोडून गेल्यानंतर वाद मिटविण्यासाठी शुक्रवारी रात्री नातेवाईकांची बैठक झाली. त्याचवेळी वाद चिघळला आणि सुभान शेखने पत्नीचे मामा व सासरे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

रुग्णालयात मृत्यू

दोघांनाही तातडीने भुसावळ ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी समद शेख यांना मृत घोषित केले, तर शेख जमील यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!