Today शुक्रवार, 6th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

NCP Leaders Meet CM : प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांची मुख्यमंत्र्यांशी महत्त्वाची चर्चा; सत्तेतील वाटा आणि एकत्रीकरणासाठी राजकीय हालचालींना वेग

NCP Leaders Meet CM : प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांची मुख्यमंत्र्यांशी महत्त्वाची चर्चा; सत्तेतील वाटा आणि एकत्रीकरणासाठी राजकीय हालचालींना वेग

NCP Leaders Meet CM Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. काल बारामतीमध्ये अजितदादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) प्रमुख नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

सत्तेतील वाटा आणि खात्यांवर खलबते
अजित पवारांच्या पश्चात त्यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडेच राहावीत, यासाठी पक्षाच्या बड्या नेत्यांनी कंबर कसली आहे. सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अजितदादांकडे असलेली वित्त व नियोजन, उत्पादन शुल्क आणि क्रीडा ही खाती राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना मिळावीत, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज दुपारी माध्यमांशी संवाद साधून यावर अधिकृत भाष्य करण्याची शक्यता आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत आता नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या तोडीचा सर्वसमावेशक नेता सध्या दुसऱ्या फळीत नसल्याने, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संकटकाळात पवार कुटुंब एकत्र येऊन पक्षाच्या भवितव्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. विलीनीकरणाचा संपूर्ण चेंडू आता शरद पवार यांच्या कोर्टात असून, ते यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेतृत्वाचा पेच
यापूर्वी दोन्ही गट एकत्र येण्यासाठी केवळ अजित पवार हेच प्रामुख्याने चर्चेत असायचे. दुसरीकडे शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे चर्चेत होते. मात्र, आता दादांच्या जाण्याने संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली असून, सत्तेतील वाटा टिकवणे आणि पक्ष वाचवणे असे दुहेरी आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर उभे राहिले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!