Today सोमवार, 3rd ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Mayor : पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे पहिल्याच दिवशी ॲक्शन मोडमध्ये; प्रशासनाला दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सुचना

Pune Mayor : पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे पहिल्याच दिवशी ॲक्शन मोडमध्ये; प्रशासनाला दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सुचना

Pune Mayor : पुणे महानगरपालिकेच्या ५८ व्या महापौर म्हणून मंजुषा नागपुरे यांनी आज सोमवारी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी आपल्या पदाची अधिकृत सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारताच त्यांनी साधेपणाचा आणि शिस्तीचा आदर्श घालून दिला. त्यांचे स्वागत करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणलेले महागडे पुष्पगुच्छ स्वीकारण्यास महापौरांनी नम्रपणे नकार दिला आणि हात जोडून केवळ अभिवादन स्वीकारले. त्यांच्या या कृतीची सध्या महापालिका वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

बिनविरोध निवड
पुणे महापालिकेच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) अर्ज दाखल केले होते, मात्र भाजपच्या विनंतीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतले. प्रभाग ३५ मधून निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे या पुणे महापालिकेच्या इतिहासात बिनविरोध निवडून आलेल्या पहिल्या महिला नगरसेविका आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे भाजपने कोणताही विजयोत्सव किंवा झगमगाट न करण्याचा निर्णय घेतला होता. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली.

पहिल्याच दिवशी ॲक्शन मोड; कचरा आणि पुराच्या प्रश्नावर भाष्य
पदभार स्वीकारल्यानंतर महापौरांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. ‘स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग’ ही त्यांची मुख्य संकल्पना असून त्यांनी प्रशासनाला पहिल्याच दिवशी काही महत्त्वाचे आदेश दिले: १. स्वच्छता: शहरात कुठेही कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या. २. पूर नियंत्रण: सिंहगड रोड परिसरातील पुराचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे आणि ‘फ्लड अलर्ट सिस्टिम’ (पूर इशारा यंत्रणा) कार्यान्वित करणे ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.

कामाचा नवा अध्याय
महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पदभार सोहळा पार पडला. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनीही महापौरांच्या शिस्तीचे स्वागत करत, पुण्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. पुण्याच्या नव्या महापौरांच्या या साध्या आणि कामाप्रती असलेल्या गांभीर्यामुळे पुणेकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!