Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती, म्हणाल्या…

Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत महत्वाची माहिती, म्हणाल्या…

बारामती : शरद पवार यांना शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली होती. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे.

प्रेम आणि आशीर्वाद हेच साहेबांचं टॉनिक

शरद पवार यांची प्रकृती ठीक आहे. बारामतीकरांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राच प्रेम आणि आशीर्वाद हेच पवार साहेबांचं टॉनिक आहे. तुम्हीच डॉक्टर आहात तुम्हीच औषध आहात. आणि तुम्हीच टॉनिक आहात, असे सुप्रिया सुळेंनी म्हंटले आहे. डॉक्टरांनी सांगितला आहे ते घरीच लोकांना भेटू शकतात. बाहेरचा प्रवास टाळायला सांगितला आहे आणि आज-उद्या प्रवास करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आमची लढाई वैचारिक

तसेच, अनेकदा सांगते वय वाढल की वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. नाती एका जागेवर आणि राजकीय भूमिका एका जागेवर असते. आमची लढाई वैचारिक आहे. आमची लढाई वैयक्तिक नाही. भाजप पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांचे भाजपसोबतच्या नेत्यांबरोबर कौटुंबिक संबंध आहेत. अटल बिहारी वाजपेयी, मुंडे कुटुंब, अरुण जेटली यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक वर्षाचे संबंध आहेत. राजकीय मतभेद नक्की आहेत, मात्र देशातील कोणत्याही कुटुंबासोबत आमचे मनभेद नाहीत, असेही सुप्रिया सुळेंनी म्हंटले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!