Today शुक्रवार, 10th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यात १३ हजार कांदा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा

राज्यात १३ हजार कांदा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा

पुणे: २०२२-२३ च्या रब्बी हंगामात कांद्याचे दर कमी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदानाचा लाभ काही कांदा उत्पादकांना झाला. परंतु, सातबारा उताऱ्यावर ई-पीक पैरा न नोंदवलेल्या शेतकऱ्यांना यात अपात्र करण्यात आले. नंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अपात्र शेतकऱ्यांना पुन्हा पात्र ठरवण्यात आले. त्यामुळे राज्यातील सुमारे १२ हजार ९४७ शेतकऱ्यांचे जवळपास २४ कोटी ७७ लाख ३३ हजार रुपयांचे अनुदान रखडले असून, प्रतीक्षा करावी लागत आहे.

दीड वर्षापूर्वी शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान योजना २०२२-२३ लागू करत उत्पादकांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. यात १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार होते. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत हे अनुदान देण्याचे राज्य सरकारने निश्चित केले. योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता नंतर ज्या शेतकऱ्यांचे सातबारा उताऱ्यावर ‘उन्हाळ कांदा नोंद’ या सबबीखाली काही शेतकऱ्यांना तालुकास्तरीय समितीने अपात्र ठरवले. त्यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांमार्फत फेरतपासणी करून अर्ज पात्र ठरवले. अशा पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी पणन विभागाच्या उपसंचालकांनी ऑगस्ट २०२४ मध्ये शासनास प्रस्ताव पाठवला होता. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.

जवळपास १३ हजार शेतकऱ्यांचे सुमारे २५ कोटींचे अनुदान त्यामुळे दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यात नाशिक, धाराशिव, पुणे, सांगली, सातारा, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील २ लाख ९१ हजार २८८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यापूर्वीच ८५१ कोटी ६७लाख रुपये जमा झाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!