Ajit Pawar: 28 जानेवारीचा तो दिवस… सकाळीच अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत अपघात झाल्याची बातमी आली. हे वृत्त समजताच तसेच त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र हळहळला. आज अजित पवार अनंतात विलीन जरी झाले असले तरी त्यांची कारकिर्द, आठवण सदैव प्रत्येकाच्या मनामनात राहील. अजित पवार हे त्यांची बोलण्याची शैली, त्यांचे निर्णय आणि राजकीय कारकिर्दीसाठी सदैव ओळखले जातात. सध्या अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील “666 कनेक्शन” ची जोरदार चर्चा होत आहे. नेमकं काय होतं अजित पवारांचं 6 क्रमांकाशी नातं?
6 क्रमांकाचा विचित्र योगायोग?
सध्या अजित पवार यांचं आणि “666′ क्रमांकाशी असलेल्या ‘कनेक्शन’ ची चर्चा होत आहे. अनेकजण याला त्यांच्या आयुष्यातील एक विचित्र योगायोग सांगत आहेत. अजित पवार 66 वर्षांचे होते आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीचे 6 महिने 6 दिवस आधी त्यांचा 66 वा वाढदिवस साजरा केला. राजकारणातील असे योगायोग नवीन नाहीत, परंतु यावेळी ही चर्चा त्यांच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीचे पैलू उलगडते.
6 वेळा उपमुख्यमंत्री…
अजित पवार सहा महिने सहा दिवसांपूर्वी ६६ वर्षांचे झाले. त्यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले, म्हणून त्यांचा क्रमांक 6 शी विशेष संबंध असल्याचं म्हटलं जातं. ते 66 वर्षांचे होते आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. काल 28 जानेवारी 2026 मध्ये झालेल्या विमान अपघातामुळे त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्णच…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून तब्बल 6 वेळेस काम केलेल्या अजित पवारांसाठी मुख्यमंत्री होणे एक स्वप्न होते. मात्र बुधवारी एका विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले, ज्यामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्या साधेपणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांनी सत्तेत असताना विविध पद भूषवत बराच प्रवास केला, परंतु त्यांच्या कार्यकर्ते, तसेत अनेकांची अजित दादांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसताना पाहण्याची इच्छा अपूर्णच राहिली
2010 ते 2024 पर्यंत उपमुख्यमंत्रीपदाचा प्रवास
अजित पवार पहिल्यांदा 10 नोव्हेंबर 2010 रोजी पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. जवळजवळ 22 महिन्यांनंतर त्यांना पायउतार व्हावे लागले, परंतु राजकारणात त्यांचे पुनरागमन झाले. 25 ऑक्टोबर 2012 रोजी ते त्याच पदावर परतले. 2019 मध्ये, त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात नाट्यमय अध्यायांपैकी एक मानल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये फक्त 80 तास उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. नंतर, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्तेत राहिले. 2 जुलै 2023 रोजी, एकनाथ शिंदे सरकारच्या काळात ते महायुतीत सामील झाले तेव्हा ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. 5 डिसेंबर 2024 पासून त्यांनी फडणवीस सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री पद भूषवले. अशाप्रकारे एकूण 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले.
योगायोग की नशीब?
सध्या अजित पवार आणि ‘666 क्रमांकाशी असलेलं कनेक्शन’ बद्दल चर्चा सुरू असली तरी, तो केवळ योगायोग आहे. वास्तव असे आहे की अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव पाडला. त्यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले, निर्णय घेतले, परंतु मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.


