Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अजितदादांच्या अपघाताचा छडा लागणार! ‘AAIB’ कडे तपासाची सूत्रं, ब्लॅक बॉक्समधून बाहेर येणार सत्य

अजितदादांच्या अपघाताचा छडा लागणार! ‘AAIB’ कडे तपासाची सूत्रं, ब्लॅक बॉक्समधून बाहेर येणार सत्य

Ajit Pawar Plane crash investigation : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण देश हादरला असतानाच, आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी केंद्राने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राची दखल घेत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या भीषण दुर्घटनेचा तपास ‘विमान अपघात तपास ब्युरो’ (AAIB) कडे सोपवला आहे. केंद्रीय मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी या तपासातून सत्य लवकरच बाहेर येईल, अशी ग्वाही दिली आहे.

तपास यंत्रणेने घटनास्थळावरून विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ (FDR & CVR) शोधून काढला आहे. हा तांत्रिक डबा अपघाताचे गूढ उकलण्यासाठी सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. अपघाताच्या शेवटच्या क्षणी वैमानिक आणि सह-वैमानिकांमध्ये काय संवाद झाला? काही तांत्रिक अडचण जाणवली होती का? याचे रेकॉर्डिंग यात असेल. विमानाची गती, इंजिनची स्थिती आणि उंची या बाबींचे विश्लेषण केले जाईल. विमानाचे इंधन दर्जेदार होते का आणि देखभालीमध्ये काही त्रुटी होत्या का, याचीही कसून तपासणी केली जात आहे.

VVIP प्रवासासाठी नवी नियमावली येणार?
अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याचा असा अपघाती अंत होणे, ही देशाच्या सुरक्षा यंत्रणेसमोरील चिंतेची बाब आहे. या चौकशीनंतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) विमान प्रवासासाठी केंद्र सरकार अधिक कडक आणि नवी नियमावली लागू करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्र आज बारामतीत एकवटला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘दादां’ना अखेरची मानवंदना देण्यात आली. पार्थ आणि जय पवार या दोन्ही पुत्रांनी आपल्या पित्याला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांनी दिलेल्या ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी बारामतीचा परिसर दुमदुमून गेला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!