Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Blood Donation Camp: पुण्यातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न; हिंदूहृदयसम्राट आणि धर्मवीरांना आगळेवेगळे अभिवादन

Blood Donation Camp: पुण्यातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न; हिंदूहृदयसम्राट आणि धर्मवीरांना आगळेवेगळे अभिवादन

Blood Donation Camp : पुण्यातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (CKP) समाज संस्थेच्या वतीने नुकतेच एका भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे हे सलग पाचवे वर्ष होते. हे शिबिर रविवार, 25 जानेवारी 2026 रोजी कर्वेनगर येथील शैलेश सभागृहात पार पडले.

याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. यामध्ये गुप्ते हॉस्पिटलचे संचालक श्री. नितीन गुप्ते, डॉ. नितीन धांडे आणि नवनिर्वाचित नगरसेविका सौ. रूपाली सचिन पवार यांचा प्रामुख्याने समावेश होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष मंदार कुलकर्णी, सचिव राजेंद्र देशपांडे, सहसचिव सौ. पूनम कारखानीस आणि विश्वस्त राहुल दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

हेही वाचा – Sinhgad Institute Crisis : पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांचे 16 महिन्यांपासून पगार थकले, कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

याशिवाय शिबिराच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त सौ. ईशा दिघे आणि खजिनदार श्री. प्रभाकर ताम्हाणे यांनीही परिश्रम घेतले. रक्तदात्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आणि या सामाजिक कार्यात सहभागी झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांचे व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!