Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरुचं; स्कूल बस अन् कारची धडक

पुण्यातील नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरुचं; स्कूल बस अन् कारची धडक

पुणे : पुण्यातील नवले पुलाजवळील ब्लॅक स्पॉटवर अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी पहाटे येथे एका स्कूल बसने कारला धडक दिल्याने दोन जण जखमी झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. वाहतूक पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हा अपघात नवले पुलाजवळील भुमकर ब्रिज परिसरात सकाळी सुमारे ७ वाजता घडला. स्कूल बस पुण्याच्या दिशेने जात असताना अचानक कारला धडकली. अपघाताची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली आहे.

नवले ब्रिज हा पुणे-बंगळुरू महामार्गावरील एक प्रमुख ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत येथे अनेक भयावह अपघात घडले आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये एका कंटेनर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने १३ वाहनांना धडक होऊन आग लागली, ज्यात ८ जणांचा मृत्यू झाला आणि १३ ते २० जण जखमी झाले होते.

त्यापूर्वी जानेवारी महिन्यात एका वेगवान कारने खासगी बसमध्ये धडक देऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यातही एका दुचाकीला ट्रकच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. या सततच्या अपघातांमुळे या ठिकाणी वेगमर्यादा ४० किलोमीटर प्रतितास ठरवण्यात आली आहे, मात्र ती पालन होत नसल्याचे दिसते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!