Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Navale Bridge Accident: नवले पूल परिसरात खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; तरुणी जखमी

Navale Bridge Accident: नवले पूल परिसरात खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; तरुणी जखमी

Navale Bridge Accident: कात्रज बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली. सक्षम ऊर्फ नितीन जुनावणे (१९, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात सक्षम जुनावणेची सहप्रवासी मैत्रीण जखमी झाली. मैत्रिणीने याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महाविद्यालयात शिक्षण घेत होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि दुचाकीस्वार नितीन हे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. रात्री पावणेदहाच्या सुमारास दुचाकीस्वार सक्षम आणि त्याची मैत्रीण नवले पूल परिसरातून कात्रजकडे निघाले होते. त्या वेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली.

रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू

अपघातात दोघे जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार सक्षम याचा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रॅव्हल्स बस चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका निकम करीत आहेत. अलिकच्या काळात पुण्यात अपघाताचे आणु मृत्यूचे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!