Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Minor Girl Abuse: मेहुणीच्या 10 वर्षाच्या मुलीवर 3 वर्ष अत्याचार; आरोपीला 25 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा

Pune Minor Girl Abuse: मेहुणीच्या 10 वर्षाच्या मुलीवर 3 वर्ष अत्याचार; आरोपीला 25 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा

Pune Minor Girl Abuse: नात्याने मावशीचा नवरा म्हणजेच काका असलेल्या एका नराधमाने संगोपनासाठी घरी आणलेल्या १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत नको ते केलं. या नराधम काकाने या चिमुकलीवर सलग तीन वर्षे अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पुणे न्यायालयाने अत्यंत कठोर पाऊल उचलत आरोपीला २५ वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, आरोपीची पत्नी हिनेच आधी तक्रार दिली. मात्र, नंतर तीच फितूर होऊनही न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे पीडितेला न्याय मिळवून दिला.

नेमकी घटना काय?
पीडित मुलीच्या आईच्या निधनानंतर, तिच्या संगोपनाची जबाबदारी आरोपीच्या पत्नीने म्हणजेच पीडित मुलीच्या मावशीने स्वीकारली होती. मोठ्या बहिणीच्या मुलीला मायेचा आधार मिळावा म्हणून तिला घरी आणले होते. मात्र, घराचा आधार देण्याऐवजी नराधम काकाने २०१८ ते मे २०२१ या कालावधीत तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

या प्रकरणात आरोपीच्या पत्नीनेच हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, सुनावणी दरम्यान आरोपीची पत्नी आपल्या जबानीपासून फिरली. अशा परिस्थितीतही विशेष न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी पीडितेची साक्ष आणि तांत्रिक पुरावे ग्राह्य धरले. पीडितेचे वय आणि गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता, आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सवलत न देता २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

आरोपीला ठोठावलेला १ लाख रुपयांचा दंड पीडित मुलीला देण्यात यावा, असं न्यायालयानं म्हटलं. तसंच हा दंड न भरल्यास आरोपीला आणखी १ वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली आणि आरोपीला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!