Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Traffic Police: ट्रिपलसीट जाताय? सावधान…; अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई; 29 लाखांचा दंड वसूल

Pune Traffic Police: ट्रिपलसीट जाताय? सावधान…; अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई; 29 लाखांचा दंड वसूल

Pune Traffic Police: बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे होणारे गंभीर रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. विरुद्ध दिशेने जाणारे, ट्रिपल सीट अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या अडीच हजार दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या. मंगळवारी दिवसभरात बेशिस्त दुचाकीस्वारांकडून २९ लाख ३८ हजार ४५० रुपये असा दंड ई-चलन यंत्राद्वारे वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे थकीत दंडाची वसुलीही झाली.

!भरधाव दुचाकी चालविणे, एकाच दुचाकीवरुन तिघांचा प्रवास (ट्रिपल सीट), विरुद्ध दिशेने जाणे (राँग साईड) अशा प्रकारचे नियमभंग करण्याचे प्रकार वाढले आहे. बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. भरधाव दुचाकीस्वार पादचाऱ्यांना धडक देऊन पसार झाल्याच्या घटना घडल्या आहे.

दुचाकीस्वार स्वत:चा जीव धोक्यात घालतात, तसेच समोरुन येणाऱ्या वाहनचालकांना हुल देतात. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्यातील पथके या कारवाईत सहभागी झाली होती. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दिवसभरात अडीच हजार दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २९ लाख ३८ हजार ४५० रुपये दंड वसूल करण्यात आला’, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

कारवाईच्या माध्यमातून परिणामांची जाणीव

‘पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई करुन दुचाकी जप्त केल्या. दुचाकीच्या कागदपत्रांची पूर्तता, तसेच थकीत दंड वसूल करण्यात आल्यानंतर दुचाकी ताब्यात देण्यात आला. या कारवाई आणि दुचाकीस्वारांना नियमभंग केल्यास होणाऱ्य परिणामांची जाणीव या कारवाईच्या माध्यमातून झाली. कर्णकर्कश हाॅर्न, तसेच सायलेन्सरमध्ये फेरफार करुन विक्री करणाऱ्या वारजे भागातील दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी नमूद केले.

पोलीस मुख्यालयात शिस्तीचे धडे

बेशिस्त वाहन चालकांचे बुधवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांना शिस्तीचे धडे दिले. समुपदेशन कार्यक्रमात ४५० ते ५०० दुचाकीस्वार सहभागी झाले होते. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्यासह वाहतूक शाखेतील अधिकारी या वेळी उपस्थित होते.

बेशिस्त दुचाकीस्वारांविरुद्ध यापुढील काळात अचानक कारवाई करण्यात येणार आहेत. पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात अडीच हजार दुचाकी ताब्यात घेतल्या. थकीत वाहतूक दंड, दुचाकी वाहनांच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दुचाकी टप्याटप्याने परत केल्या जाणार आहेत. – मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!