Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

रेल्वे रूळ अन् लोकोपायलटवर एआयची नजर, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाय; 77 प्रवासी इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये एआय कॅमेरे बसवणार

रेल्वे रूळ अन् लोकोपायलटवर एआयची नजर, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाय; 77 प्रवासी इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये एआय कॅमेरे बसवणार

पुणे: मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील ७७ प्रवासी इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये एआय आधारित कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हे कॅमेरे ३६० अंशांच्या कोनातून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतील. त्यामुळे रुळांपासून इंजिनच्या आतील हालचाली टिपल्या जाणार आहेत. या कॅमेऱ्यामुळे अपघाताचे कारण शोधणे सोपे होणार आहे. शिवाय रेल्वे पायलटवर वॉच ठेवता येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेत आणखी भर पडणार आहे. प्रत्येक इंजिनमध्ये अंदाजे दहा लाख रुपये खर्चुन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. या कॅमेऱ्यामधील रेकॉर्डिंग पूर्णपणे ऑफलाइन मोडमध्ये असेल, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हंकिंगचा प्रकार होणार नाही. आपत्कालीन परिस्थितीच्या तपासात महत्त्वाचे इनपूट मिळेल. त्याचा फायदा सत्य शोधण्यास होणार आहे.

पुणे रेल्वे विभागाच्या ताफ्यात एकूण ७७ इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिन आहेत. प्रत्येक इंजिनमधील दोन्ही बाजूला असलेल्या चालक केबिनमध्ये प्रत्येकी एक कॅमेरा, तर इंजिनच्या बाहेर चार, बाजूला एक अशाप्रकारे, एका इंजिनमध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक इंजिनमध्ये सीसीटीव्ही ठेवणारी यंत्रणा बसवली जाणार आहे. हे कॅमेरे हाय डेफिनेशन आणि हाय रिझोल्युशनचे असतील. त्यामुळे रुळ, रेल्वे क्रॉसिंग व परिसरातील हालचालींवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. परिणामी, अपघातांची कारणे शोधण्यात ही प्रणाली उपयुक्त ठरेल, तसेच डयूटीवर असताना लोकोपायलट काय करतोय, याची माहिती मिळणार आहे. हे कॅमेरे लावण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

त्यानंतर कॅमेरे लावण्यात येतील. याबाबत मध्य रेल्वेचे पुण्याचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहेरा यांनी सांगितले, पुणे विभागातील सर्व इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये एआय कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणखीच वाढणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!