Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न; विनयभंग करणार्‍या ज्योतिषाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न; विनयभंग करणार्‍या ज्योतिषाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे: पुण्यात एका जोतिष्याने तरुणीला एकांतात बोलावून मंत्र देण्याच्या ऐवजी विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या संतापजनक घटनेनंतर ज्योतिषाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणार्‍या एका भोंदू ज्योतिषाने हे कृत्य केलं आहे. ही घटना धनकवडी भागात घडली आहे. अखिलेश लक्ष्मण राजगुरु असे अटक केलेल्या ज्योतिषाचे नाव आहे. याबाबत एका 25 वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मैत्रिणीने संबंधित ज्योतिषी पत्रिका पाहून भविष्य सांगतो, त्याच्याकडे जाऊन ये, असे सांगितले होते. फिर्यादी या त्यांच्या भावाची पत्रिका घेऊन या ज्योतिषाकडे 12 जुलै 2025 रोजी गेल्या. जोतिष्याने पत्रिका पाहिल्यानंतर “तुमच्या भावाला एक वनस्पती द्यायची ती मागवून घेतल्यावर तुम्ही या,” असं सांगितले होते.

त्यानंतर 18 जुलै रोजी ज्योतिषाने फिर्यादी यांना वनस्पती घ्यायला उद्या या, असं सांगितलं. त्यानुसार फिर्यादी 19 जुलै रोजी जेव्हा जोतिष्याच्या धनकवडी येथील कार्यालयात गेल्या, तेव्हा त्याने “आणलेली वनस्पती तुमच्या डोक्यावर ठेऊन मंत्र म्हणावे लागतील” असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांना संशय आल्याने त्या ठिकाणाहून निघाल्या. दरम्यान, अखिलेश राजगुरु या भोंदु ज्योतिषाने अचानक फिर्यादींना मिठी मारत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी यांनी याबाबतची माहिती भावाला फोन करुन कळवत पोलिसात तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच सहकारनगर पोलिसांनी भोंदु ज्योतिषाच्या कार्यालयावर छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!