Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास बारामतीत विमान अपघातात निधन झालं. या घटनेनं राज्यात शोककळा पसरली असून नेते, कार्यकर्ते धक्क्यात आहेत. अजित पवार यांच्यासह एकूण ५ जणांचा या विमान अपघातात जागीच मृत्यू झाला. राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते बातमी कळताच बारामतीच्या दिशेने रवाना झाले होते. पवार कुटुंबीय 12 च्या सुमारास बारामती रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली असून सगळ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. अजित पवार विमानाने बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला.
सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे ढसाढसा रडल्या
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये दाखल झाल्या. त्यावेळी त्यांच्यासह सुप्रिया सुळे आणि सर्व कुटुंब होत.बारामतीमध्ये दाखल होताच सुनेत्रा पवार या ढसाढसा रडताना दिसल्या. त्यांना पाहून उपस्थितांनाही आपले अश्रू अनावर झाले. बारामतीत सध्या हालचालींना वेग आला आहे. राज्यातील त्यांचे सर्व कार्यकर्ते आक्रोश
शरद पवारांनी घेतली अपघाताची माहिती
शरद पवारांनी अपघात स्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर ते बारामतीतील रुग्णालयाच्या दिशेने रवाना होत असून परिस्थितीची माहिती घेत आहेत. दरम्यान प्रतिभा पवार या देखील रुग्णालयात दाखल होत आहेत.
राज्यपालांसह देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात आज सुट्टी आणि तीन दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्याशिवाय, उदया शासकीय इतमामात सकाळी अकरा वाजता अजित पवारावर अंत्यसंस्कार पाडणार आहे. काही वेळा पूर्वीच राज्यपालांसह देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली.
रुग्णालय परिसरात नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या रुग्णालयाबाहरे हजारोंचा समुदाय दाखल झालाय.


