Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar : निलेश घायवळ प्रकरणावर अजित पवार रोखठोक बोलले, म्हणाले कोण पक्षाचा…

Ajit Pawar : निलेश घायवळ प्रकरणावर अजित पवार रोखठोक बोलले, म्हणाले कोण पक्षाचा…

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील गोळीबार प्रकरणाने खळबळ माजली असताना, घायवळ गँगचा म्होरक्या निलेश घायवळ याच्या राजकीय कनेक्शन्सवर आता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रोकठोक बोलले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या”परिवार मिलन” कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, “कोण कुठल्या गटाचा, पक्षाचा, कुणाचा जवळचा कार्यकर्ता आहे, हे बघू नका. जर कायद्याची पायमल्ली झाली असेल, तर दोषींवर कठोर कारवाई करा!” या विधानाने महायुतीतील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले असून, पोलिसांना राजकीय दबावापासून मुक्त करण्याचे आश्वासन पवारांनी दिले.

शस्त्र परवाना वाद, “शिफारस केली तरीही सीपींनी नाकारला”

निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळवण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हस्तक्षेप केल्याचे आरोप समोर आले आहेत. यावर अजित पवार म्हणाले, “मला आयुक्तांनी सांगितले की, काही लोकांनी शिफारस केली असली तरी शस्त्र परवाना दिलेला नाही.

मी सीपींना स्पष्ट सांगितले आहे, पुण्याचा असो वा महाराष्ट्रातील कोणीही असो, कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. मी कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही.” पवार यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमादरम्यानही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हीच भूमिका घेतल्याचे नमूद केले. “चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल,” असा शब्द पवारांनी दिला.

राजकीय आरोपांवर सणसणीत प्रत्युत्तर

शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निलेश घायवळशी जवळीक असल्याचे आरोप केले होते. यावर पवार म्हणाले, “कोण काय म्हणतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण फोटो काढले म्हणजे संबंध असतात का? सेल्फी घेतात, फोटो येतात, पण पुरावा नसेल तर कारवाई कशी? चौकशीत फोन रेकॉर्ड्स, संभाषणे आढळली तरच कारवाई होईल.

” पवार यांनी पक्षप्रवेशाच्या चुकीच्या निर्णयांचाही उल्लेख केला: “मागे आझमभाई पानसरे यांनी चुकीच्या व्यक्तीला पक्षप्रवेश दिला, मला कळल्यावर काढून टाकला. मी जाहीर सांगतो, अन्याय झाला तर सर्वस्व पणाला लावेन, पण हात बरबटले असतील तर पाठीशी घालू शकत नाही.”

“मंत्र्याच्या दबावाने झाली तर तो दोषी!”

निलेश घायवळने खोटा पासपोर्ट वापरून लंडन (नंतर स्वित्झर्लंड) ला पळ काढल्याचा प्रकार समोर आल्यानंतर, पवार म्हणाले, “घायवळला पासपोर्ट कोणी दिला, शिफारस कोणी केली, याची चौकशी सुरू आहे. शिफारस केली तरीही सीपींनी परवाना नाकारला, पण जर मंत्र्याच्या आग्रहाने कारवाई झाली असेल, तर तो मंत्री दोषी आहे.”

३२ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत पवार म्हणाले, “मी एखादी फाइल रिमार्क केली तर सचिवाकडून वस्तुस्थिती येते. पण दबावाने झाले तर चौकशी होईल.” पुणे पोलिसांनी घायवळच्या घरात छापा टाकून शस्त्रे, सोने, रोख रक्कम आणि मालमत्ता कागदपत्रे जप्त केली असून, लूक आऊट सर्क्युलर जारी केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!