बारामती : बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. विमानाचा बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अपघात झाला आहे. विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या दुर्घटनेत अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक थोडक्यात बचावले आहेत. या अपघातामध्ये ३ ते ४ जण जखमी झाले असून बारामतीमधील या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा प्रशासनाकडून स्पष्ट निवेदन आलेले नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झाले असून, नेमकी परिस्थिती काय आहे याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत सूत्रांकडून माहिती येण्याची प्रतीक्षा आहे.


