Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आतड्यांचा कर्करोग ठरू शकतो जीवघेणा; सुरुवातीच्या ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष…

आतड्यांचा कर्करोग ठरू शकतो जीवघेणा; सुरुवातीच्या ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष…

आपण निरोगी असावं असं अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. त्यात आतड्यांचा कर्करोग हा एक जीवघेणा आजार ठरू शकतो. त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे विशेष लक्ष दिल्यास तो नियंत्रणात आणता येऊ शकतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

पेटके येणारी पोटदुखी ही आतड्याच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकते, बहुतेकदा लोक गॅस किंवा सामान्य पोटदुखी समजून दुर्लक्ष करतात. पण, तसे करू नये. यातील ट्यूमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया आणि सहा महिने केमोथेरपी केली जाते. हा एक अनुवांशिक बदल असून, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढतात आणि वेगाने पसरतात. पण, एक नवीन प्रकारची इम्युनोथेरपी देण्यात येते. ज्यामध्ये सेटुक्सिमॅब इन्फ्युजन आणि एन्कोराफेनिब नावाची औषधे आहेत. या औषधांमुळे आजारांवर नियंत्रण आणता येऊ शकते.

आतड्याचा कर्करोग, ज्याला कोलन कर्करोग असेही म्हणतात, सामान्यतः आतड्याच्या आतील अस्तरात तयार होणाऱ्या लहान पॉलीप्सपासून सुरू होतो. जर हे पॉलीप्स वेळेवर काढले नाहीत तर ते कर्करोगात विकसित होऊ शकतात आणि लिम्फ नोड्स किंवा रक्तप्रवाहाद्वारे शरीराच्या इतर भागात पसरू शकतो.

अनेकदा दिसत नाहीत लक्षणे…

कधीकधी आतड्याच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे दिसत नाहीत. परंतु, दीर्घकाळापर्यंत पोटदुखी, मलमध्ये रक्त येणे, फुगणे, अचानक वजन कमी होणे, उलट्या होणे, थकवा आणि श्वास लागणे यासारख्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

काय काळजी घ्यावी?

धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, जंक फूड, रेड आणि प्रक्रिया केलेल्या मांसाचे जास्त सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. वेळेवर निदान आणि जीवनशैलीत बदल हे या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग मानले जातात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!