Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे हादरले..! गणपती बुकिंगसाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलीला ट्रकने चिरडले, थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद

पुणे हादरले..! गणपती बुकिंगसाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलीला ट्रकने चिरडले, थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात 12 ऑगस्ट रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक अपघाताने संपूर्ण शहर हादरले आहे. गणपती बुकिंगसाठी आईसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या 11 वर्षीय प्रत्युषा संतोष बोराटे हिचा सिमेंट मिक्सर ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी तिची आई वैशाली बोराटे (35) गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या थरारक अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

हा अपघात हिंजवडी फेज 2 मधील इन्फोसिस सर्कलजवळ सायंकाळी 6:30 च्या सुमारास घडला. प्रत्युषा आणि तिची आई वैशाली गणपती बुकिंगसाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्याचवेळी फरहान मुन्‍नू शेख (25, वाकड) हा सिमेंट मिक्सर ट्रक भरधाव वेगाने चालवत होता.

हिंजवडी परिसरात अवजड वाहनांना सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत बंदी असताना, शेख याने नियमांचे उल्लंघन करत ट्रक चालवला. त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रत्युषा आणि वैशाली रस्त्यावर पडल्या. दुर्दैवाने, प्रत्युषा ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. वैशाली यांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून त्याची काच फोडली. यानंतर चालक शेख याने ट्रक सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंजवडी पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली. सागर सुभाष आगलावे (बुधवार पेठ, पुणे) यांनी बुधवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शेख याच्याविरुद्ध भादवि कलम 304(अ) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि मोटर वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!