Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Land Scam : पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा; तहसीलदारांसह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune Land Scam : पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा; तहसीलदारांसह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : शहरात आणखी एक मोठा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या मालकीची सरकारी जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याच्या आरोपावरून तहसीलदारासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले, तसेच शितल तेजवानी, दिग्विजय पाटील, हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक आणि जयश्री एकबोटे यांचा समावेश आहे.

नायब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ या काळात हा प्रकार घडल्याचं नमूद केलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बोपोडी परिसरातील सुमारे ९ हेक्टर जमीन सन १८८३ पासून कृषी विभागाच्या ताब्यात होती. शासनाच्या आदेशानुसार ही जमीन अॅग्रीकल्चर डिपार्टमेंटच्या नावावर कायम ठेवण्यात आली होती. मात्र, काही अधिकाऱ्यांनी आणि खासगी व्यक्तींनी खोटे आदेश व दस्तऐवज तयार करून ही जमीन खाजगी नावावर दाखवली, असा गंभीर आरोप आहे.

या प्रकरणात मेसर्स अमेडिया एंटरप्रायझेस् एलएलपी आणि व्हिजन प्रॉपर्टी या कंपन्यांचाही संबंध असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी संगनमत करून शासनाची फसवणूक केली, असेही पोलिसांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!