Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पार्थ पवारांना जमीन विकणारी शीतल तेजवानी नेमकी कोण? जाणून घ्या

पार्थ पवारांना जमीन विकणारी शीतल तेजवानी नेमकी कोण? जाणून घ्या

Parth Pawar Land Scam: पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन खरेदी व्यवहाराची सध्या राज्यतभरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या कंपनीतील 99 टक्के भागभांडवल पार्थ पवार यांच्याकडे असूनही, त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. उलट फक्त एक टक्का भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

या प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या 5 कोटी 89 लाख रुपयांहून अधिक मुद्रांक शुल्काची चोरी करण्यात आली. त्यात येवले यांच्यासह दिग्विजय पाटील, रविंद्र तारू आणि शीतल तेजवानी यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मात्र पार्थ पवारांचे नाव या यादीत नसल्याने या कारवाईच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हेही वाचा –पार्थ यांच्या कंपनीसह सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय, पुणे तहसीलदार आणि सहदुय्यम निबंधकांचे निलंबन

शीतल तेजवानी कोण आहेत?

या व्यवहाराशी संबंधित असलेल्या शीतल तेजवानी यांचा भूतकाळ देखील तितकाच गाजलेला आहे. शीतल आणि सागर तेजवानी या दाम्पत्याने सेवा विकास बँकेच्या विविध शाखांतून तब्बल 41 कोटींची कर्जे घेतली होती. या कर्जांसाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता, असा आरोप 2019 मध्ये झालेल्या सहकार विभागाच्या ऑडिटमध्ये स्पष्ट झाला. त्यांनी घेतलेली कर्जे नियोजित उद्देशासाठी न वापरता इतर व्यवहारांमध्ये वळवली गेल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, जानेवारी 2023 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सागर सूर्यवंशी यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे 45 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, तर 2023 मध्ये सागर यांना पुन्हा अटक करण्यात आली.

पार्थ पवार जमीन व्यवहाराची पार्श्वभूमी

हा व्यवहार पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 40 एकर जमिनीशी संबंधित आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार ही जमीन 1819 साली महार वतनदारांना देण्यात आली होती. 1957 मध्ये सरकारने ही जागा बोटॅनिकल डिपार्टमेंटकडे वर्ग केली. 1962 मध्ये फेरफारांनंतर जागेचा काही भाग भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्राला भाडेतत्त्वावर देण्यात आला. पुढे, 2006 मध्ये वतनदारांकडून शीतल तेजवानी यांच्या नावावर पॉवर ऑफ अॅटर्नी करण्यात आली. याच पॉवर ऑफ अॅटर्नीच्या आधारे शीतल तेजवानी यांनी ती जमीन पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीला विकली. या प्रकरणात सर्वाधिक चर्चा होतेय ती म्हणजे कंपनीतील मुख्य भागीदार असलेल्या पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का नाही? सर्व व्यवहार त्यांच्याच कंपनीमार्फत झाले असूनही, त्यांचे नाव आरोपपत्रात नसल्याने कायद्याच्या समानतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!