Today शनिवार, 1st ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Local Body Election : २४६ नगरपरिषदा अन् ४२ नगरपंचायतींसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

Local Body Election : २४६ नगरपरिषदा अन् ४२ नगरपंचायतींसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

Local Body Election : महाराष्ट्रातील २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज (१० नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीत २८८ अध्यक्ष आणि ६,८५९ सदस्यांची निवड होणार असून, २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत आहे, तर १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी आणि २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अंतिम उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबरला जाहीर होईल.

राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर निर्णयप्रक्रियेचे अधिकार दिल्यामुळे या निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महा विकास आघाडीसारख्या प्रमुख आघाड्यांमध्ये राज्यस्तरीय चर्चा न झाल्याने अनेक ठिकाणी सोयीच्या स्थानिक आघाड्या आणि समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे पक्षीय चिन्हावर न लढवता स्थानिक आघाड्यांवर भर देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उमेदवारी अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज आणि शपथपत्र भरावे लागेल, त्याची प्रिंटआऊट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावी लागेल. प्रत्येक उमेदवार चार वार्डांमध्ये उभा राहू शकतो, तर जातीचे वैधता प्रमाणपत्र किंवा त्याची पावती अनिवार्य आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल, ज्यात सुमारे १ कोटी ६० लाख मतदार आहेत. एकूण १३,३५५ मतदान केंद्रे उभारली जातील, तर ईव्हीएमद्वारे मतदान होईल. आयोगाने उमेदवार आणि मतदारांसाठी मोबाईल अॅपही लॉन्च केले आहे, ज्यात संपूर्ण माहिती उपलब्ध असेल.

जिल्हास्तरीय घडामोडी

कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्वीकारले जातील. राजकीय पक्षांनी युद्धपातळीवर काम सुरू केले असून, बहुतांश उमेदवार निश्चित झाले आहेत. प्रशासनाने अर्ज स्वीकारण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्या वगळता इतर दिवशी प्रक्रिया चालेल.

पुणे जिल्ह्यातील ३९८ जागांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी ३९८ जागांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यात बारामती (अ वर्ग), लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे आणि फुरसुंगी-उरळी देवाची (ब वर्ग) तसेच सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरुनगर (क वर्ग) नगरपरिषदा आणि मंचर, वडगाव मावळ, माळेगाव बुद्रुक नगरपंचायतींचा समावेश आहे. येथे ६ लाख ३४ हजार ९४० मतदार आहेत. अध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होईल, तर आचारसंहिता लागू झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!