नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, मेटा (फेसबुक) यांसारख्या ऍप्सचा वापर वाढताना दिसत आहे. असे असताना आता व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर आणत आहे जे युजर्सना चांगली सुरक्षा देऊ शकेल. तसेच त्यांना सायबर गुन्हेगार आणि हॅकिंगपासून देखील संरक्षण देईल. या फीचरचे नाव आहे स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्ज.
WABetaInfo ने याबाबतची माहिती शेअर केली आहे, ज्यामध्ये ते सध्या चाचणीत असल्याचे म्हटले आहे. हे आगामी व्हॉट्सअॅप फीचर युजर्संना अधिक मजबूत सुरक्षा देत आहे. हे मोड सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. हे एक सुरक्षा तयार करेल. युजर्संना कोणतेही फीचर मॅन्युअली अक्षम करण्याची आवश्यकता नाही. हे फीचर तुम्हाला सायबर गुन्हेगार आणि हॅकर्सपासून दूर ठेवेल. हे व्हॉट्सअॅप फीचर अशा वेळी आले, जेव्हा भारतासह जगभरातील लोक सायबर गुन्हेगार आणि हॅकर्सच्या धोक्याचा सामना करत आहेत. हे हॅकर्स वैयक्तिक तपशील, फोटो, व्हिडिओ आणि अगदी बँक खाती देखील चोरत आहेत. मात्र, याला आळा घालता येणार आहे.
या नव्या फीचरनुसार, मीडिया आणि अटॅचमेंटवर निर्बंध लादले जातील. अज्ञात नंबरवर कोणताही डेटा पाठवला जाणार नाही. अज्ञात नंबरवरून येणारे व्हॉट्सअॅप कॉल म्यूट केले जातील. ग्रुप इन्व्हिटेशन देखील ब्लॉक केली जातील. लिंक प्रीव्ह्यू ब्लॉक केले जातील. Two Type Verification देखील असणार आहे. वैयक्तिक तपशील पाहू शकणाऱ्या लोकांची संख्या कमी केली जाईल. निवडलेल्या लोकांना प्रोफाइल फोटो आणि स्टेट्स अपडेट देखील दिसतील.


