Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणेकरांनो लक्ष द्या! 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणेकरांनो लक्ष द्या! 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune News : पुणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वडगाव बुद्रुक येथे स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मंगळवार, 17 मार्च 2026 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 18 मार्च 2026 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

कोणते मार्ग बदलले जाणार?

कोरेगाव भीमा बाजूकडून चाकण-पाबळकडे जाणारी अवजड वाहतूक कोरेगाव भिमा – सणसवाडी – शिक्रापूर – गॅस फाटा – वाजेवाडी चौफुला या मार्गे वळविण्यात येणार आहे.

चाकण-पाबळकडून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला – गॅस फाटा – शिक्रापूर – सणसवाडी – कोरेगाव भिमा या पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.

भाविकांसाठी वाहनांवर निर्बंध

कोरेगाव भीमा बाजूकडून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना संस्थेजवळ निश्चित करण्यात आलेल्या स्टॉपेज पॉइंटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच चाकण आणि पाबळ मार्गे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना वढू – वाजेवाडी चौफुला मार्गावरील पार्किंग पॉइंटच्या पुढे जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र व्हीव्हीआयपी, व्हीआयपी तसेच शासकीय वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!