Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati Nagar Parishad Election : सस्पेन्स संपला! बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांनी उमेदवारी देताच भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा

Baramati Nagar Parishad Election : सस्पेन्स संपला! बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांनी उमेदवारी देताच भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा

बारामती : तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या बारामती नगर परिषद निवडणुकीत अखेर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने सचिन सदाशिव सातव यांना घड्याळाच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर करून सस्पेन्स संपवला. दुसरीकडे, भाजपने गोविंद देवकाते यांना ओबीसी चेहरा म्हणून उतरवले. मात्र, महाविकास आघाडीकडून (शरद पवार गटासह) अजूनही उमेदवाराची घोषणा बाकी आहे, तर बसपाने काळूराम चौधरी यांना तिकीट दिले आहे.

अजित पवार गटाचा तगडा चेहरा

विद्यमान बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेले सचिन सातव हे यापूर्वी नगर परिषदेचे नगरसेवक राहिले आहेत. अजित पवारांच्या विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सातव हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. अजित गटाने २० प्रभागांतील ४१ जागांसाठी एकूण ४४ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रभागनिहाय दोन-दोन उमेदवार आहेत, ज्यात काही ठिकाणी तिसरा उमेदवारही समाविष्ट आहे.

राष्ट्रवादीची उमेदवार यादी

नगराध्यक्षपद : सचिन सदाशिव सातव
प्रभाग क्र. १ : मनिषा समीर चव्हाण, अविनाश निकाळजे
प्रभाग क्र. २ : जय पाटील, अनुप्रिता डांगे
प्रभाग क्र. ३ : प्रविण दत्तू माने, रुपाली नवनाथ मलगुंडे
प्रभाग क्र. ४ : विष्णुपंत चौधर, संपदा चौधर
प्रभाग क्र. ५ : किशोर आपणासाहेब मासाळ, ऋतुजा प्रताप पांगळे
प्रभाग क्र. ६ : अभिजीत जाधव, धनश्री अविनाश बांदल
प्रभाग क्र. ७ : प्रसाद खारतुड, भारती विश्वास शेलके
प्रभाग क्र. ८ : अमर घुमाळ, श्वेता योगेश नाटे
प्रभाग क्र. ९ : विशाल भानुदास हिंगणे, पूनम ज्योतिबा चव्हाण
प्रभाग क्र. १० : जयसिंग देशमुख, अनिता गायकवाड,
प्रभाग क्र. ११ : संजय संधवी, सविता जाधव,
प्रभाग क्र. १२ : अभिजीत चव्हाण, सारिका अमोल वाघमारे
प्रभाग क्र. १३ : बिरू भाऊसाहेब मांदरे, सुनीता अरविंद बगाडे
प्रभाग क्र. १४ : नवनाथ बल्लाळ, आप्पा अहीवळे
प्रभाग क्र. १५ : जितेंद्र बाबनराव गुजर, मंगल जयरकश किरवे
प्रभाग क्र. १६ : मंगल शिवाजीराव जगताप, गौरख पारसे
प्रभाग क्र. १७ : अल्ताफ सय्यद, शमीला शिवाजीराव ढवाण
प्रभाग क्र. १८ : राजेंद्र सोनवणे, अखिनी सूरज सातव
प्रभाग क्र. १९ : सुनील दादासाहेब सरसे, प्रतिभा विजय खारत
प्रभाग क्र. २० : प्रथमेश प्रविण गालिंदे, दर्शना विक्रांत तांबे, फरहीन फिरोज बागवान

भाजपकडूनही उमेदवार जाहीर

दरम्यान, भाजपने ३० जागांसाठी उमेदवार दिले असून, नगराध्यक्ष पदासाठी गोविंद देवकाते यांना निवडले आहे. ओबीसी समाजातील हा चेहरा पक्षाच्या सामाजिक समीकरणाला मजबूत करणार आहे. सत्ताधारी महायुतीतील भागीदार असूनही बारामतीत भाजप राष्ट्रवादी अजित गटाविरुद्ध थेट लढणार. यंदा तिहेरी लढत अपेक्षित असून, शरद पवार गटाची ताकदही महत्त्वाची ठरेल.

महाविकास आघाडीचा सस्पेन्स कायम

शरद पवार गटासह महाविकास आघाडीकडून अजून कोणताही उमेदवार जाहीर झालेला नाही. युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा असली तरी अधिकृत घोषणा बाकी आहे. तर काळूराम चौधरी यांना नगराध्यक्ष पदासाठी तिकीट मिळाले आहे, ज्यामुळे दलित मतांचा लढत प्रभावित होईल.

 

 

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!