Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुलीने बदलला जबाब; जहीर शेखसह चौघांवर गुन्हा दाखल

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुलीने बदलला जबाब; जहीर शेखसह चौघांवर गुन्हा दाखल

Bhigwan Kidnapping Case : भिगवण येथील अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. याआधी स्वतःच्या इच्छेने मुलासोबत गेल्याचे सांगणाऱ्या तरुणीने आता जबाब बदलत जहीर शेख याने आपले अपहरण केल्याचा आरोप केला आहे.

तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे. या प्रकरणी जहीर शेखसह चौघांविरोधात अपहरण तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात झाली होती. तेव्हा तरुणीच्या भावाने शेजारी राहणाऱ्या जहीर शेखविरोधात अपहरणाची तक्रार केली होती. मात्र त्यानंतर तरुणीने स्वतः पोलिसांना व्हिडिओ पाठवून आपण स्वेच्छेने त्याच्यासोबत गेल्याचे सांगितले होते आणि प्रेमसंबंध असल्याचेही नमूद केले होते.

दरम्यान, या प्रकरणात तरुणीवर दबाव असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता. त्यांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणीही केली होती.

तसेच न्यायालयातही तरुणीने सुरुवातीला आरोपीच्या बाजूने जबाब दिला होता. मात्र दोन महिन्यांनंतर अचानक जबाब बदलल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून बदललेल्या जबाबानंतर पुढील कायदेशीर कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!