पुणे : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि. २५) पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्यात वनाज ते चांदणी चौक (मार्ग 2A) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (मार्ग 2B) या दोन उन्नत मार्गांना समाविष्ट करण्यात आले आहे. हे मार्ग आधीच्या वनाज–रामवाडी (फेज-1) मेट्रो मार्गाचा विस्तार असणार आहेत.
पुणे मेट्रो फेज-2
-प्रकल्पास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.
-पुणे मेट्रो फेज-2 च्या विस्ताराचा निर्णय.
दोन नवीन कॉरिडॉर
मार्ग 2A: वणजे ते चांदणी चौक
मार्ग 2B: रामवाडी ते वाघोली / विठ्ठलवाडी
प्रमुख वैशिष्ट्ये
एकूण लांबी: 12.75 किमी
एकूण स्थानके: 13
प्रमुख क्षेत्रे: चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी, वाघोली


