पुणे: साडी किंवा मॉडर्न ड्रेसमध्ये स्लिम आणि फिट दिसण्यासाठी जर तुम्ही बॉडी शेपर, टमी टकर वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. काही तासांसाठी किंवा मिनिटांसाठी तुम्हाला स्लिम लूक देणारे हे बॉडी आऊटफिट तुमच्या शरीराची हानी करू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
प्रामुख्याने स्थूल शरीर असलेल्या किंवा पोट सुटलेल्या तरुणींमध्ये स्लिम दिसण्यासाठी बॉडी शेपर किंवा टमी टकर वापरण्याचा ट्रेंड आहे. हे टमी टकर किंवा शेपवेअर अशा पद्धतीने तयार करण्यात आलेले असतात की, त्यांचा दबाव शरीराच्या प्रत्येक पार्ट्सवर येतो. ज्यामुळे ते शरीरावर फिट बसतात. जसे की कंबर, ओटीपोट यात काही टमी टकर पॅण्टीज ओटी पोटावर इतक्या फिट बसतात की, तुमचे सुटलेले पोट सपाट दिसते. त्यामुळे तुम्ही स्लिम दिसता.
काही बॉडी शेपवेअर संपूर्ण शरीरासाठी वापरले जातात. ज्यामुळे सुटलेलं शरीर सुडौल दिसते. पण खरं तर हे बाँडी आऊटफिट तुमच्या शरीराच्या मसल्सवर इतका दबाव टाकतात की, आतील नसा दबल्या जातात. जर तुम्ही दिवसभर किंवा सात-आठ तास हे बॉडी आऊटफिट वापरले तर तुम्हाला इरिटेबल बाऊल सिंड्रोम, पोट फुगणे, छातीत जळजळ तसेच बद्धकोष्ठ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्ही जाड मांड्या कव्हर करण्यासाठी विशिष्ट शेपवेअर वापरत असाल तर त्यांचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होण्याचा धोका वाढतो. कारण टाइट शेपवेअरमुळे तुमच्या मांड्यांच्या स्नायूंवर दबाव येतो. त्यामुळे त्या आकुंचन पावतात. परिणामी, हाता-पायासह हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.


