Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची एंट्री; सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीवर प्रश्नचिन्ह

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची एंट्री; सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीवर प्रश्नचिन्ह

Baramati By Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून आता ही लढत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. सुरुवातीला सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीची चर्चा रंगली होती. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यानंतर काँग्रेसनेही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

२३ एप्रिल २०२६ रोजी राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. बारामती मतदारसंघ अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आता जोरदार तयारी सुरू केली आहे.

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ही जागा लढवणार नसेल, तर काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, असा ठराव मंजूर करण्यात आला. जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी ही माहिती दिली.

काँग्रेस भवनात झालेल्या या बैठकीत स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांनी बारामतीतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. महाविकास आघाडीचा धर्म पाळत, योग्य वेळी निर्णय घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला सकारात्मक भूमिका दर्शवत त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवार दिला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिवंगत अजित पवार यांची बारामतीत असलेली मजबूत पकड, विकासकामे आणि जनसंपर्क यामुळे मतदारसंघात सहानुभूतीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना फायदा होऊ शकतो. मात्र काँग्रेस आणि इतर घटक पक्ष मैदानात उतरल्यास ही निवडणूक अधिक रंगतदार होणार, यात शंका नाही.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!