Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

IAS Sanjiv Hans : IAS संजीव हंस यांच्यावर गुन्हा दाखल, CBI कडून तपास वेगात, नेमकं प्रकरण काय?

IAS Sanjiv Hans : IAS संजीव हंस यांच्यावर गुन्हा दाखल, CBI कडून तपास वेगात, नेमकं प्रकरण काय?

IAS Sanjiv Hans : वरिष्ठ आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्याविरोधात मोठा भ्रष्टाचाराचा आरोप समोर आला असून, १ कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, संजीव हंस हे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयात मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील नामांकित बिल्डर्सकडून अनुकूल निर्णय मिळवून देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात विपुल बन्साल यांनी मध्यस्थाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी अनुभव अग्रवाल यांची संजीव हंस यांच्यासोबत भेट घडवून आणली. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात (NCDRC) संबंधित बिल्डरच्या बाजूने अनुकूल तारखा मिळवून देण्यात आल्या, तसेच अटकेपासून दिलासा मिळवून देण्यात मदत केल्याचा आरोप आहे.

या बदल्यात, ठरल्याप्रमाणे १ कोटी रुपयांची रक्कम विपुल बन्सल यांच्या माध्यमातून संजीव हंस यांना देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी संजीव हंस यांच्यासह विपुल बन्सल, अनुभव अग्रवाल आणि इतर काही व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!