Today शुक्रवार, 18th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Accident News: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह; येरवड्यात भरधाव कारचा थरार, भरधाव कार दुकानात घुसली

Pune Accident News: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह; येरवड्यात भरधाव कारचा थरार, भरधाव कार दुकानात घुसली

Pune Accident News: पुण्यात अनेक अशा घटना घडत आहेत ज्यामुळे शहराची एक वेगळीच ओळख बनत चालली आहे. मग त्यात टोळी युद्ध असो की घरघुती हिंसा असो या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यातच कोयता गँगची ही दहशत पुण्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व सामान्य पुणेकर भीतीच्या सावटाखाली आहेत.पुण्यात काही ड्रिंग अँड ड्राईव्हच्या ही घटना घडल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावरून चालायचे की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडला होता. त्यात आता आणखी एक ड्रिंग अँड ड्राईव्ह साखी घटना समोर आली आहे.

पुणे शहरात ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’च्या घटना थांबायचं नाव घेत नाही. काल म्हणजेच शनिवारी मध्यरात्री येरवड्यातील सादल बाबा दर्गा परिसरात एका भरधाव कारने धुमाकूळ घातला होता. मद्यधुंद अवस्थेत चालक गाडी चावलवत होता. त्याला कसलेच भान राहीले नव्हते असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. अशा स्थितीत गाडी चालवत असताना गाडीवरचे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित झाली. त्यानंतर ती थेट रस्त्याकडेला असलेल्या एका दुकानात जाऊन घुसली.

हे तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघातानंतर एकच पळापळ झाली. या भीषण अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात कारचा प्रचंड वेग स्पष्टपणे दिसत आहे. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने दुकानात किंवा रस्त्यावर कोणीही नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, दुकानाचे आणि कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा ड्रिंग अँड ड्राईव्हचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटना सारख्या कशा होतात असा प्रश्नही आता आम पुणेकर विचारत आहेत.

पुणे पोलीस ही अशा घटना होवू नये साठी प्रयत्न करत असतात. पण असं असलं तरी त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. उलट या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचा प्रत्यय शनिवारीही आला. हा अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पुणेकरांच्या ही याबाबत संतापजनक प्रतिक्रीया येत आहेत. दरम्यान या अपघाताला कारणीभूत असलेल्या ड्रायव्हरवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!