Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar and Sharad Pawar: तुतारी गायब? महापालिकेतील अपयशानंतर घड्याळाच्या चिन्हावर लढण्याची शरद पवारांचा पक्ष तयारी करण्याची शक्यता

Ajit Pawar and Sharad Pawar: तुतारी गायब? महापालिकेतील अपयशानंतर घड्याळाच्या चिन्हावर लढण्याची शरद पवारांचा पक्ष तयारी करण्याची शक्यता

Ajit Pawar and Sharad Pawar: राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निकालानंतर भाजपला मोठे यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला फारसे यश मिळवता आलेले नाही. अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र येथेही मित्रपक्ष असलेला भाजप वरचढ ठरला. यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत.

मात्र या निवडणुकीत तुतारी नाही तर घड्याळाच्या चिन्हांवर लढण्याची तयारी शरद पवारांच्या पक्षाकडून केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मत विभाजन टाळून एकत्र लढल्यास फायदा होईल अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेतली जात आहे.

काल झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी त्यांना अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमधील मत विभाजन टाळण्यासाठी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, 16 जानेवारी पासून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम

16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाईल
अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होईल.
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत.
निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी – 27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर जाहीर केली जाईल.
मतदानाचा दिनांक – 5 फेब्रुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.
मत मोजणी आणि निकाल – 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून.

कोणत्या विभागातील कोणत्या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक?

कोकण विभाग – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
संभाजीनगर विभाग – संभाजीनगर, परभणी, धाराशीव व लातूर

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!