Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMC Election 2026:’डरपोक राजकारणाला शिवसेनेचे वाघ घाबरत नाहीत’, पुण्यात एकनाथ शिंदेंचा इतर पक्षांना इशारा

PMC Election 2026:’डरपोक राजकारणाला शिवसेनेचे वाघ घाबरत नाहीत’, पुण्यात एकनाथ शिंदेंचा इतर पक्षांना इशारा

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत. कात्रज येथे उमेदवारांच्या प्रचारसाठी ते दाखल झाले आहेत. इथून पुढे त्यांचा रोड शो देखील होणार आहे. कात्रज येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना स्वबळावर लढत आहे म्हणून हलक्यात घेऊ नका असा इशारा त्यांनी इतर पक्षांना दिला आहे.

शिंदे म्हणाले, महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना एकटी लढत आहे. म्हणून इतरांनी कुणीही आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्हाला कमजोर समजू नका. काही लोक स्वतःला मालक समजतात. आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्ही एकदा आपटले की, पुन्हा उठत नाही. त्यामुळे आम्हाला कमी समजू नका. शिवसेना मोठा पक्ष आहे. डरपोक राजकारणाला शिवसेनेचे वाघ घाबरत नाहीत. ते बाळासाहेबांचे वाघ आहेत. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारी शिवसेना नाही. नगरपरिषद मध्ये मविआ कुठेही दिसत नाहीत. त्यांनी पराभव स्वीकारला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

लाडकी बहीण बंद होणार नाही

आपला अजेंडा विकास आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणे आहे. अनेक कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या आहेत. चांदणी चौकात खूप ट्राफीक होत असते. मी इथून जाताना लोकांनी मला थांबवून या व्यथा सांगितल्या होत्या. मी तातडीने सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आता तिकडचं ट्राफिक दूर झालं आहे. कात्रजच ट्राफिक दूर करणार आहोत. विधानसभेच्या पहिल्या भाषणात सांगितलं होत, कि आम्ही २०० पार करणार तेव्हा २३२ आणले. शेवटी सर्व काही जनतेच्या हातात आहे. एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरु केली. अनेकांनी त्याला विरोध केला. पण तुमचा एकनाथ खमक्या भाऊ बसला होता. त्यामुळे ती सुरु झाली. कोणी माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. एक बार मैने कमिटमेंट कर दि तो मैं अप ने आप कि भी नाही सुनता असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले.

नेहमी कार्यकर्ता म्हणून काम केले पाहिजे

शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मुख्यमंत्री, आमदार, महापौर कोणाच्याही डोक्यात नेता म्हणून कधीही हवा जात कामाला नये. नेहमी कार्यकर्ता म्हणून काम केले पाहिजे. आपला पाठीचा कणा कार्यकर्ता असतो. आपण शिवसैनिकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. कार्यकर्त्याला मानसन्मान मिळाला पाहिजे.

घरांचा टॅक्स आपण कमी करू.

कुणीतरी इथं प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याच भाष्य केलं होत. पण नगरविकास खात माझ्याकडे आहे. आपण घरांचा टॅक्स माफ करून टाकू. बघतो करतो आपल्याकडे असं नाही. रिसल्ट ऑन द स्पॉट असं काम आपण करतो. घरांचा टॅक्स आपण कमी करू. ट्राफिक मुक्त पुणे, कात्रज आपण करू, अनेक वर्ष सत्तेत असणाऱ्या लोकांना विचारलं पाहिजे. या समस्या का राहिल्या आहेत. नगरविकासच्या माध्यमातून जे काही रद्द करता येईल ते आपण करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!