Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सासवडजवळ हृदयद्रावक अपघात; शेतातून घरी परतणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याला मोटारीची धडक, दोघांचा मृत्यू

सासवडजवळ हृदयद्रावक अपघात; शेतातून घरी परतणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याला मोटारीची धडक, दोघांचा मृत्यू

सासवड : पुणे जिल्ह्यातील सासवड येथे शनिवारी (16 ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. शेतातील काम आटोपून घरी चालत परतणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याला भरधाव मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दाम्पत्य गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आनंदराव रामचंद्र यादव आणि सिंधुमती आनंदराव यादव (राहणार यादववाडी, ता. पुरंदर) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या प्रकरणी मोटारचालक बापूराव जगताप (राहणार माहुर, ता. पुरंदर) याला सासवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सासवड-वीर रस्त्यावरील यादववाडी गावच्या हद्दीत, फार्महाऊस हॉटेलजवळ ही दुर्दैवी घटना घडली. पोलिस पाटील अमित गणपत यादव (रा. यादववाडी, ता. पुरंदर) यांनी याबाबत सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदराव आणि सिंधुमती यादव हे शेतातील काम संपवून सायंकाळी घरी चालत परतत होते. याचवेळी बापूराव जगताप याने आपल्या इको मोटारीने भरधाव वेगाने येत त्यांना पाठीमागून धडक दिली. या जोरदार धडकेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मोटारचालक बापूराव जगताप याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!