Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूर तालुक्यात सायंकाळच्या लोडशेडिंगचा मोठा फटका; विद्यार्थी आणि शेतकरी आक्रमक, वेळेत बदलाची मागणी

इंदापूर तालुक्यात सायंकाळच्या लोडशेडिंगचा मोठा फटका; विद्यार्थी आणि शेतकरी आक्रमक, वेळेत बदलाची मागणी

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बोरी-वालचंदनगर गटामध्ये सध्या सायंकाळी 6 ते 10 या वेळेत सुरू असलेल्या भारनियमनामुळे (लोडशेडिंग) नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ऐन परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत असून, शेतकरी वर्गही या परिस्थितीमुळे हतबल झाला आहे. या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी आता परिसरातून होत आहे.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे हाल; अंधारामुळे चोऱ्यांची भीती
सध्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचे दिवस असून सायंकाळच्या वेळी वीज नसल्याने अभ्यासात मोठे अडथळे येत आहेत. याशिवाय, ग्रामीण भागात सायंकाळी वीज नसल्यामुळे दैनंदिन घरगुती कामांची ओढाताण होत आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वीज कपातीच्या या नियोजनामुळे ग्रामीण भागातील जनता सध्या अंधारात चाचपडत आहे.

भारनियमनाच्या वेळेत बदलासाठी महावितरणला साकडे
या गंभीर समस्येची दखल घेत पुणे जिल्हा परिषद सदस्या निर्मला मिसाळ यांनी महावितरणच्या बारामती येथील मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. लोडशेडिंगची सध्याची वेळ बदलून ती सायंकाळी 5.30 ते 7.30 आणि पहाटे 5 ते 7 या कालावधीत करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या रात्रीच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही आणि शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

प्रशासनाला ठिय्या आंदोलनाचा इशारा
शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रशासनाने लोडशेडिंगच्या वेळेत त्वरित बदल करावा, अशी आग्रही मागणी निर्मला मिसाळ यांनी केली आहे. जर महावितरणने या मागणीची दखल घेतली नाही, तर मुख्य जंक्शन कार्यालयासमोर शेतकरी आणि विद्यार्थ्यांसह तीव्र ‘ठिय्या आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!